Monday, February 8, 2010

तुझ्या हसण्याने ....

तुझ्या मंद हसण्याने .. फुलवि मयूर पिसारे ..
स्मित करताच एक..येती अंगास शहारे ..

मन बेभान हे माझे.. वाट पाहे हसण्याची ..
तुझ्या एका हसण्याने .. होते कमाई मोलाची..
स्वर ऐकताच तुझा .. वाहे संगीताचे वारे..
स्मित करताच एक..येती अंगास शहारे ..

सुकुमार गालावर .. एक खळि उमट्ते ..
नाज़ुक वेलीवर जणु .. एक कळि उमलते .
तुझ्या गालावरची खळि.. मन वेडावते सारे..
स्मित करताच एक..येती अंगास शहारे ..

उघड़ता ओठ खुलती.. मोती आगार मोलाचे..
मोती उधळती सारे .. गाता राग हसण्याचे ..
तुझ्या हास्यात विझति .. माझी वेदना निखारे...
स्मित करताच एक..येती अंगास शहारे ..

Thursday, February 4, 2010